बिझनेस सुरु करण्यासाठी धम्माल आणि मालामाल करणाऱ्या बिझनेस आयडिया
तुम्हाला अनेक वर्ष नौकरी करून कंटाळा आला असेल आणि तुम्ही बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
या लेखात आपण काहीही गुंतवणूक न करता चालू करता येणारे बिझनेस, कमी गुंतवणुकीत सुरु करता येणारे बिझनेस अशा अनेक बिझनेस आयडिया बद्दल चर्चा करणार आहोत. प्रथमतः आपण सध्याच्या काळात बिझनेस सुरु करणे किती गरजेचे आहे. याबद्दल बोलूयात.
१) बेरोजगारीचे वाढते प्रमाण –
आपल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. मध्यंतरी असा एक आकडा आला होता की, गेल्या ४५ वर्षात भारतात सर्वाधिक बेरोजगारी आहे. रेल्वेच्या काही हजार जागासाठी तब्बल एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केला होता. आता या एक कोटी अर्जदारापैकी काही हजार लोकांनाच रोजगार मिळणार आहे. बाकी कोट्यावधी लोकांनी काय करायचं ?
भारतात सरकारी क्षेत्रात दोन टक्के पेक्षा कमी लोकं काम करतात. ज्या आयटी क्षेत्राचा उदोउदो केला जातो आहे. त्या क्षेत्रात तर एक टक्क्यापेक्षा कमी लोकांना रोजगार मिळालेला आहे. मोठ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या अनेक क्षेत्रातील कामाचे मशिनीकरण केलेले आहे. त्यामुळे तिथेही रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे.
असा सर्वत्र रोजगाराचा दुष्काळ आहे. अशा काळात स्वतःचा बिझनेस सुरु करणे म्हणजे वाळवंटात एखादा झरा शोधून काढण्यासारखे आहे.
२) बिझनेसला असलेली अनुकूल परिस्थिती –
देशात नौकरी मिळणे अवघड झाले आहे मात्र बिझनेस सुरु करणे सोपे झाले आहे. याचे तीन महत्वाचे कारणे आहेत. पूर्वीच्या काळापेक्षा सध्याच्या काळात अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. जगात संगणक आणि इंटरनेट क्रांती झाल्याने आपण देशातल्या कोणत्याही काना- कोपऱ्यात बिझनेस चालू करू शकतो. आपल्या बिझनेस साठी लागणारी माहिती, कच्चा माल, ग्राहक हे सर्व आपल्याला इंटरनेटच्या कृपेने सहज उपलब्ध होते. त्यासाठी वणवण भटकण्याची गरज पडत नाही. आशियन पेंट्स ही भारतीयांनी चालू केलेली कंपनी आहे. ही कंपनी चालू करताना त्यांना पायी फिरून, घरोघरी जाऊन पेंट्स विकावे लागले होते. आता तशी परिस्थिती नाही.
दुसरे कारण म्हणजे पायाभूत सुविधांचे वाढलेले प्रमाण –
बिझनेस मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे पायाभूत सुविधा. तुम्ही युट्युबर बनायचे असेल तर सर्व ठिकाणी चांगले नेटवर्क असले पाहिजे, नेट स्पीड चांगले असले पाहिजे, तसा मोबाईल असला पाहिजे. अशा सुविधा आता गावागावात निर्माण झाल्या आहेत. दुसरे म्हणजे तुम्हाला कोणत्या पदार्थावर प्रक्रिया करून तो विकायचा असेल तर चांगले रस्ते असायला हवेत, पाण्याची सुविधा असायला हवी. भारतात रस्त्यांचे जाळे आता चांगले विकसित झाले आहे. बाकी अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत.
तिसरे कारण म्हणजे सरकारच्या योजना –
केंद्र व राज्य सरकारे नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहेत. मुद्रा लोन सारख्या अनेक योजना काढलेल्या आहेत. ज्याद्वारे लोकांना अतिशय कमी व्याजदरात लोन दिले जात आहे. स्टार्ट अप सुरु करण्यासाठी देखील सरकार अनेक सुविधा पुरवत आहे. सरकारच्या बिझनेस चालू करणाऱ्या व्यक्तीवर असल्याने बिझनेस सुरु करणे सोपे झाले आहे. या बिझनेस द्वारे तुम्ही यशस्वी व्यक्ती होऊ शकता आणि सोबत बाकी अनेकांना देखील रोजगार देऊ शकता.
नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी काय- काय आयडिया आहेत. त्याबद्दल चर्चा करूयात.
१ ) शून्य गुंतवणूक करून सुरु करता येणारे बिझनेस –
हे टायटल वाचून अनेकांना धक्का बसला असेल की, असेही बिझनेस आहेत की, ज्यात कोणतीही गुंतवणूक न करता चालू करता येऊ शकतात. तर मित्रानो याचे उत्तर होय आहे. असे अनेक बिझनेस आहेत. जे काहीही पैसा न लावता चालू करता येऊ शकतात. सर्वांकडे आता स्मार्ट फोन आहेत. त्यात इंटरनेट आपण दररोज वापरत असतो. सोशल मीडिया वापरतो. एवढ्या साधनावर आपण आपला बिझनेस चालू करू शकतो. कोणाची लिखाण चांगले असेल, एखाद्या विषयाबाबत त्याला खोलवर ज्ञान असेल तर तो आपला ब्लॉग चालू करतो आणि ब्लॉग लिहून मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो.
अशाच प्रकारे युट्युबवर, सोशल मीडियावर व्हिडीओ बनवूनही तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्यात जे काही कौशल्य आहे, ते काढा बाहेर… कुणाला चांगला डान्स करता येत असेल, कुणाला रांगोळी काढता येत असेल, चांगले जेवण बनवता येत असेल, फिरायची आवड असेल. एवढे असले तरी चालणार आहे. हे करत असताना व्हिडिओ बनवा. ते टाका आणि आपला बिझनेस चालू करा. गावागावातील लोकांनी असे व्हिडिओ टाकून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे. आता त्यांची कमाई महिन्याला कोट्यवधी मध्ये आहे.
२) प्रक्रिया उद्योग –
सध्याच्या काळ हा इंटरनेटचा आहे तर येणारा काळ हा प्रक्रिया उद्योगाचा असेल. सध्याच्या घडीला भारत बहुतांश उद्योगात आघाडीवर आहे पण प्रक्रिया उद्योगात मात्र अजूनही खूप पिछाडीवर आहे. खासकर शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या बाबतीत. भारतात शेतीमालावर फक्त २ टक्के प्रक्रिया केली जाते.
भारत हा अजूनही कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीमाल हा प्रचंड मोठ्या प्रमणात उत्पादित होतो. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वायाही जातो. दरवर्षी तब्बल ४० टक्के शेतीमाल वाया जात असतो. हा वाया जातो फक्त त्या मालावर प्रक्रिया न केल्यामुळे. शेतीमालावर प्रक्रिया करणे हे अतिशय सोपे आणि कमी खर्चिक काम आहे. टोमाटो केचअप बनवणे खूप अवघड नाही, सहज बनवता येऊ शकते. त्याचप्रमाणे बटाटा चिप्स, आवळा कॅन्डी, असे अनेक पदार्थ बनवता येऊ शकते. भारतातील जवळपास सर्व शेतमालावर काहीना काही प्रक्रिया करून पक्का माल तयार करता येऊ शकतो.
शेतमालावर प्रक्रिया करण्याचे अजून दोन मोठे फायदे आहेत. त्यातला पहिला म्हणजे कच्चा मालाची मुबलक उपलब्धता. भारतात शेतीमाल मोठ्या प्रमाणात पिकतो, दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही म्हणून टोमाटो, कांदे अशा रस्त्यावर फेकून द्याव्या लागतात. आपण त्यावर प्रक्रिया करणारा बिझनेस चालू केल्यास शेतकऱ्यांना देखील फायदा होतो आणि ग्राहकांना देखील. दुसरा मोठा फायदा म्हणजे या उद्योगात यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे कारण हे आहे की, या उद्योगात स्पर्धा खूप कमी आहे. सध्या देशात असा एकही प्रचंड मोठा उद्योग नाही. जो शेतीमालावर प्रक्रिया करतो आहे. जे काही थोडेसे आहेत. ते लहान आहेत.
शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सरकार कडून मोठ्या प्रमाणात सवलती आणि प्रोत्साहन दिले जात आहे. अशा सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होईल.
३) इतर बिझनेस –
आपली अर्थव्यवस्था सेवा क्षेत्राकडे झुकलेली आहे. सेवा देणारे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
तुम्हाला चांगला योगा करायला जमत असेल तर योगा क्लास चालू करू शकता, सध्या योगा करण्याचे लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे.
तुम्हाला चांगला डान्स जमत असेल तर डान्स क्लास चालू करा…
गणपती व इतर कार्यक्रमाच्या वेळी ढोलची मागणी खूप वाढलेली आहे, त्याचा व्यवसाय चालू करा. डेकोरेशन करायला तुम्हाला चांगले जमत असेल तर तोही व्यवसाय चालू करू शकता. डीजेला सध्या मागणी जोरात आहे तर हा डीजेचाही व्यवसाय सुरु करू शकता.
कपडे धुवून प्रेस करण्याच्या व्यवसाय सध्या चांगला व्यवसाय आहे. मोठ्या शहरात विद्यार्थ्यांना, इतर व्यक्तींना कपडे धुणे जमत नाही. यामुळे या व्यवसायात देखील तेजी आहे.
स्पर्धा खूप वाढल्याने सध्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावत आहे. लहानपणापासून ते चांगली नौकरी लागेपर्यंत बहुतांश जनता क्लासेस लावत आहे. तुम्हाला यात गती असेल तर हाही बिझनेस चालू करायला हरकत नाही.
इव्हेंट मनेजमेंटची सध्या चलती आहे. कोणालाही आपले लग्न, कार्यक्रम, समारंभ हे करायला वेळ नाही. यामुळे बरेच जण हे काम व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे देतात. या कारणामुळे हा बिझनेस मध्येही पैसा भरपूर आहे.
वरील पैकी ज्या मध्ये ज्ञान असेल, माहिती असेल, त्यात आवड असेल. त्यात तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता.